आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गोविंदसिंग टाक टोळीविरुद्ध ¨मोक्का°अंतर्गत कारवाई

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 20, 2021

स्वारगेट पोलिसांचा सहा जणांविरोधात गुन्हा नोंद : स्थानबद्धतेनंतर पुन्हा दहशत निर्माण करण्यास सक्रिय

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : एका वर्षाच्या स्थानबद्धते नंतरही समाजात पुन्हा दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड गोविंदसिंग टाक आणि त्याच्या टोळीविरुद्ध ¨मोक्का°अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत डायस प्लॉट, गुलटेकडी, पुणे येथे राहणारा व स्वतःला भाई, दादा समजून समाजात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार गोविंदसिंग पापुलसिंग टाक या नेत्याचे साथीदारासह इकडील भागात खुनाचा प्रयत्न गैरकायद्याची मंडळी जमवून घातक शस्त्रांसह दरोडा, खंडणी मारामारी, घातक शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागील काळात केले असल्याने त्यास सन २०१९ मध्ये एका वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले होते. नमूद आरोपी सदर कारवाईतून सुटल्यानंतर पुन्हा त्याने आपल्या साथीदारांना एकत्र करून खुनाचा प्रयत्न व दुखापतीचे दोन गुन्हे केले आहेत आणि स्वतःचे व साथीदारांच्या उपजीविकेकरिता जबरदस्तीने दहशत करून हप्तेवसुली केली आहे.


दि. २८ जुलै २०२१ रोजी गोविंदसिंग पापुलसिंग टाक याने आपल्या साथीदारांचे मदतीने आपली दहशत व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता वरील भागात दहशत करून सदर भागातील व्यावसायिकास मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.


सदर गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रसाळ यांनी सदर गुन्ह्यात प्रथम गोविंदसिंग टाक आणि नंतर त्याचे इतर साथीदार यांना अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

तपासादरम्यान गोविंदसिंग टाक हा स्वतःचे व आपल्या टोळीचे वर्चस्व स्थापित करण्याकरिता साथीदारांचे मदतीने खुनाचा प्रयत्न, दुखापत, दरोडा खंडणी तसेच घातक हत्यारे बाळगून आपली टोळी चालविण्याकरिता अवैधरीत्या हप्ते गोळा करणे, खंडणी मागणे अशी बेकायदा कृत्ये करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचे व त्याच्या साथीदारांच्या दहशतीमुळे कोणीही तक्रार करण्यास धजावत नसल्याचे दिसत असल्याने त्याच्या अशा बेकायदा कृत्यांना आळा घालण्याकरिता त्याच्या विरुद्ध सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये कारवाई होण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी पोलीस उप आयुक्त यांच्यामार्फतीने अपर पोलीस आयुक्तांना सादर केला होता.

सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर टोळीप्रमुख गोविंदसिंग टाक याने व आपली गुन्हेगारी कृत्ये सतत चालू ठेवली असल्याने स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा नोंद असून, या गुन्ह्यातील टोळीप्रमुख गोविंदसिंग पापुलसिंग टाक (वय २२ वर्षे, रा. गुलटेकडी पुणे), राहुल ऊर्फ लल्ल्या संजय कांबळे (वय २०, रा. मंगळवार पेठ, पुणे), गणेश साहेबराव तुपे, (वय ३१, रा. मंगळवार पेठ, पुणे), ओंकार राजेद्र भुजबळ ( वय २२, रा. ४८९, गणेश पेठ पुणे), सुनील विजय चव्हाण (वय २७, रा. गणेश पेठ, पुणे), सौरभ उर्फ साहील शिवशरण कांबळे (वय १९, रा. गुलटेकडी) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलमांचा समावेश करण्याबाबत अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी मंजुरी दिल्याने आरोपीविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत पुढील कारवाई केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत.


सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपआयुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, तसेच सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, अशोक येवले, फौजदार प्रमोद कळमकर, पोलीस नाईक विजय कुंभार, वैभव मोरे, विजय खोमणे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बढे, मनोज भोकरे, लखन ढावरे, संदीप साळवे, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, शैलेश वाबळे, दीपक खेंदाड, सचिन दळवी, ऋषीकेश टिटमे, गोडसे (सर्व स्वारगेट पोलीस स्टेशन) यांच्या पथकाने केली आहे.


पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुधद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देऊन त्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ¨मोक्का°अंतर्गत आतापर्यंत ५५ कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

get_footer();