आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास ५ वर्षे सक्तमजुरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 8, 2021

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : धानोरी परिसरातील सोसायटीमध्ये घडला होता प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्‍यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला.

लखन पेरियार याला शिक्षा सुनावण्यात आली. २६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धानोरी परिसरात हा प्रकार घडला. याबाबत पिडीतेच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरकार पक्षातर्फे अरूंधती ब्रम्हे यांनी कामकाज पाहिले. याप्रकरणात त्यांनी ५ साक्षीदार तपासले. गुन्ह्यात पिडीत मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून सतीश जाधव यांनी कामकाज पाहिले. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 1 वर्षांचा कारावास भोगावा लागेल. तसेच, दंडाची रक्कम पिडीतेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. घटनेच्या दिवशी पिडीता सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांसमवेत खेळत होती. यावेळी, ती सोसायटीच्या वॉचमनच्या मुलीला खेळायला बोलावण्यासाठी तिच्या घरात गेली. यावेळी, त्याठिकाणी असलेल्या वॉचमनच्या नातेवाईकाने तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर करत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्‍यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला.

get_footer();