आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अंमली पदार्थांची तस्करी करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 31, 2021

खडक पोलिसांची कारवाई : नऊ ग्रॅम ८१ मिलीग्रॅम मेथाडोन जप्त

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तीन प्रकरणातील सराईताला जेरबंद करून ४५ हजार रुपये किमतीचे मेथाडोन एम डी हस्तगत केले. खडक पोलिसांनी कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कानिफनाथ ऊर्फ कान्हू विष्णू नायडू (वय ४७, रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांचे गैरव्यवहाराच्या अनुषंगाने खडक पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी आरोपीविषयी पोलिसांना माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जुना मोटार स्टँड येथील मोकळ्या जागेत नऊ ग्रॅम ८१ मिलीग्रॅम मेथाडोन (एम.डी.) अंमलीपदार्थ जप्त केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();