आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अभिलेखावरील तडीपार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 22, 2021

वर्षभर दिला पोलिसांना गुंगारा : दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक-१ची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अभिलेखावरील तडीपार आणि गंभीर दुखापतीमधील एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले असून, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ने ही कारवाई केली

तडीपार व फरारी आरोपीविषयी सहायक पोलीस फौजदार शेख व स्टाफ गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस शिपाई दगडे व कोळप यांना सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा करून फरारी आरोपी वडगाव पठार येथे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेतले असून, पुढील कार्यवाहीसाठी सिंहगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. ओमकार वडमारे (वय २१, रा. पठार वस्ती, वडगाव पठार, पुणे, मूळ गाव- गेवराई, जि. बीड, राजापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस फौजदार शाहिद शेख, पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे व ऋषिकेश कोळप यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();