आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बाप रे… 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कारी रिक्षाचालक जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 11, 2021

पुणे स्टेशन परिसरातील घटना : सीसीटीव्हीच्या आधारे घेतला आरोपीचा शोध

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सामूहिक बलात्काराच्या घटनेतून पुणे शहर सावरले नसतानाच गुरुवारी पहाटे आणखी एक धक्कादायक प्रकार पुणे स्टेशन परिसरात घडला. एका रिक्षा चालकाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी काही तासातच आरोपींला जेरबंद केले आहे.

‘तक्रार प्राप्त होताच, पोलिसांची पथके मुलीच्या शोधासाठी रवाना झाली. तांत्रीक विश्‍लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याला अटक करण्यात आली. आरोपीचे आडनाव मांढरे असे आहे, असे बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन बस स्थानकालगत पीडित मुलीचे कुटूंब रहाते. पहाटे पिडीत मुलगी आईच्या कुशित झोपली असताना, आरोपी रिक्षाचालकाने तीला उचलून रिक्षात ठेवले. यानंतर रिक्षा थेट मार्केटयार्ड येथील एका पडीत इमारतीजवळ नेली. तेथे इमारतीच्या वरच्या मजल्यावर तिला नेऊन बलात्कार केला.

दरम्यान, घरच्यांना जाग आल्यावर मुलगी कुशीत नसल्याचे दिसले. त्यांनी सुरवातीला आजूबाजूला शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही नुकत्याच घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर परिसर पिंजून काढला तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत काढत त्याला मार्केटयार्ड परिसरात जेरबंद केले. यानंतर पिडीत मुलीला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();