आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बाप रे… 80 वर्षीय आईला 60 वर्षाच्या मुला -सुनेकडून मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 9, 2021

फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल : काठीने मारल्याने हात झाला फॅक्चर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ८० वर्षाच्या जन्मदात्या आईला ६० वर्षाच्या मुलाने काठीने मारुन तसेच ५५ वर्षाच्या सुनेने चपलेने मारहाण केली. काठीने मारहाण केल्याने वृद्ध आईचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी जखमी झालेल्या महिलेच्या 60 वर्षीय मुलावर आणि 55 वर्षीय सुनेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

बुधवार पेठेत राहणार्‍या ८० वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा फिर्यादीचा मोठा मुलगा आहे. सोमवारी रात्री ८ वाजता फिर्यादी घरात खाटेवर झोपल्या असताना मोठा मुलगा व त्यांची पत्नी हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करुन तू आमचा मुलगा सागर याला मारुन टाकण्याचा प्रयत्न करते, असे बोलून जमिनीवर पडलेली काठी घेवुन मुलाने आपल्या ८० वर्षाच्या आईच्या हातावर, अंगावर मारहाण केली. त्यांच्या सुनेने चपलेने मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. फरासखाना पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

get_footer();