आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या १९० रिक्षाचालकांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 15, 2022

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : ‘आरटीओ’समोर आंदोलन करणार्‍यांना घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ओला, उबेर यांच्या बाईक टॅक्सी बंद कराव्यात, या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर रस्ता अडवून आंदोलन करणार्‍या बघतोय रिक्षावाला संघटनेच्या कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर व त्यांचे इतर १८९ कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात विना परवाना बाईक टॅक्सी सुरु करण्यात आली आहे.

त्यांच्यावर आरटीओ कारवाई करत असली तरी त्यांचे अ‍ॅप बंद करावे, अशी मागणी बघतोय रिक्षावाला संघटनेकडून गेल्या १ महिन्यांपासून सुरु आहे. संघटनेने शनिवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंत आर.टी.ओ. समोर आंदोलन केले होते. त्यामुळे आर. टी. ओ चौकातून जहांगीर हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अडवून वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता.

संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी विनापरवाना लाऊड स्पिकर लावून त्यावरुन भाषणे करुन मोठमोठ्या घोषणाबाजी करुन रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, एन.एम. वाडिया हॉस्पिटल या महत्वाचे हॉस्पिटलकडे जाणारा महत्वाचा रस्ता अडविल्याने हॉस्पिलकडे जाणार्‍या रुग्णवाहिन्यांना लांबच्या रस्त्याने जावे लागत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जिवीतास धोका होऊ शकतो, याची जाणीव असतानाही त्यांनी रस्ता अडवून नागरिकांची गैरसोय केली. आंदोलनाच्या वेळी त्यांनी सामाजिक अंतर न पाळता विनामास्क आंदोलन करुन शासकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता अपमान केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

get_footer();