आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन सात लाखाला घातला गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 21, 2021

लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल : वाघोलीतील ४० वर्षीय महिलेची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ऑनलाइन खरेदीत ऑर्डर बुक न होताच पैसे कट झाल्याने अनोळखी मोबाईलधारकाने पैसे परत मिळवून देतो, असे सांगून पत्नीच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन ७,०८,०७९ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.

आनंगा सुंदर अमंता (वय ४०, रा. गुलमोहोर रेसिडेन्सी, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीने ऑनलाइन पद्धतीने कपड्यांच्या खरेदीसाठी चार हजार रुपयांचे ट्रान्जेक्शन केले. मात्र, ऑर्डर बुक न होताच पैसे कट झाले. त्यामुळे फिर्यादीने गुगल अॅपवरून नंबर मिळवून फोन केला. तेव्हा अनोळखी मोबाईलधारक व्यक्तीने तुमचे पैसे परत करतो असे सांगून फिर्यादीच्या पत्नीच्या बँक खात्याविषयी गोपनीय माहिती घेऊन सात लाख आठ हजार ७९ रुपयांचे ट्रान्जेक्शन करून फसवणूक केली. लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार पुढील तपास करीत आहेत.

get_footer();