आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बारा लाखाची खंडणी घेणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 10, 2021

खंडणी विरोधी पथक-२ची कारवाई : समर्थ पोलीस स्टेशनकडून तपास सुरू

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वार्षिक २४० टक्के दराने व्याज घेत बारा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने ही कारवाई केली.

सावकार विनोद रामा शिंदे याच्यावर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पियुश शहा यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने कारवाई केली.

पियुश शहा यांनी विनोद रामा शिंदे या सावकाराकडून जून २०२० ते सप्टेंबर २०२१ दरम्यान दोन लाख रुपये सावकारी कर्ज घेतले होते. त्यावर १५ ते २० टक्के व्याजाने शहा यांनी शिंदे यांना सप्टेंबर २०२१ पर्यंत रोख व गुगल पेद्वारे दोन लाख ८० हजार रुपये व्याज परत केले होते. सप्टेंबर २०२१ पासून आजपर्यंत प्रतिदिवसाला दहा हजार व दोन हजार रुपये दंड स्वरूपात अतिरिक्त १२ लाख रुपयांची मागणी करीत असल्याबाबत शहा यांनी तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार चौकशी करून पुराव्यानुसार अर्जदार गैरअर्जदार याचेविरुद्ध फिर्याद दिल्याने अवैध सावकारी केलेबाबत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, प्रवीण पडवळ, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();