आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शी, बारामती, कुर्डूवाडी, टेंभुर्णीमध्ये चोरी करणारे चौघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 31, 2021

बार्शी पोलिसांची कारवाई : आरोपी सराईत गुन्हेगार, विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शी शहर पोलीस स्टेशन हद्दीसह बारामती, कुर्डुवाडी, टेंभुर्णीमध्ये चोरी करणाऱ्या चार सराईतांच्या बार्शी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीवर नवी मुंबई, ठाणे, रायगड या जिल्हयातील रेकॉर्डवरील आरोपी आहेत. आरोपी महेंद्र उर्फ मोटया अविनाश पाटील तुर्भे पोलीस स्टेशनमधून तडीपार आहे. वाशी पोलीस स्टेशन पोलीस तपास करीत आहेत. आरोपी मारूती चंद्रशेखर दासर यांच्यावर दोन गुन्हे, महेंद्र उर्फ मोटया अविनाश पाटील याच्यावर ३६ गुन्हे, अभिजीत गौतम कांबळे याचे वर १२ गुन्हे, अजय अर्जुन कानगुलकर याच्यावर एक असे विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

मारुती चंद्रशेखर दासर (वय २७) महेंद्र ऊर्फ मोटया अविनाश पाटील (वय २५, दोघे रा. हनुमाननगर, महापे, ठाणे- बेलापूर, नवी मुंबई), अभिजीत गौमत कांबळे (वय २४, रा. कोपरखैरणे मयुर बारसमोर, नवी मुंबई, अजय अर्जुन कानगुलकर (वय २२, रा. गणेश पंचमी सोसायटी, नवी मुंबई
अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, बार्शी शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २८/०८/२०२१ रोजी १) गणेश भिमराव कानडे यांच्या होलसेल जिन्स दुकानाचे शटर उचकटून वीस हजार रोख, ४७ हजार किमतीचा माल, २) अमित माधव आपटे यांच्या आपटे मेडिकल दुकानामधून चार हजार रोख, ३) प्रविण दलाराम राठोड यांच्या सूरज गारमेंट दुकानातून चार हजार रोख रक्कम, ४) अनाराम रूपाराम चौधरी यांच्या पिकॉक लाईफ स्टाईल दुकानातून चाळीस हजार रोख रक्कम व ३९ हजार रुपयांचे ड्रेस मटेरियल, ५) गौस म. रफीक तांबोळी यांच्या जी. एम. ट्रेडर्स दुकानातून चार हजार रोख, ६) रणजित संजय अंधारे यांच्या रोहीत एजन्सी तेल दुकानातुन ७० हजार रोख रक्कम, ७) संदिप विजयकुमार बगले याच्या बगले मेडीकल दुकानातून अठरा हजार रोख असा एकूण दोन लाख ४६ रुपयांच्या ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता. या गुन्ह्याची सी. सी. टि. व्ही. फुटेज यांच्या आधारे तपास केला असता, आरोपी नवी मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलीस पथकाने आरोपींना ताब्यात घेतले असता आरोपींनी रिट्स कारचा वापर करून बार्शी शहरात घरफोड्या करून, त्याच दिवशी बारामती, कुर्डुवाडी, टेंभुर्णी परिसरात चोऱ्या केल्याचे तपासात कबुली दिली. आरोपींकडून गुन्हयामध्ये वापरलेली कार ताब्यात घेतली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डी. डी. उदार करीत आहेत.

पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक अभिजीत धाराशिवकर बार्शी विभाग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे सर्जेराव पाटील, बार्शी शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके, बार्शी शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक डी. डी. उदार, पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे, सहायक पोलीस फौजदार वरपे, पोलीस मुख्य शिपाई माळी, पोलीस नाईक भांगे, डेंगल, पवार, घोंगडे, बारगीर, गोसावी, लगदिवे व सायबर शाखेचे पोलीस शिपाई रतन जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();