आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शीतील व्यापाऱ्याला खडी क्रशर चालविण्यासाठी मागितली खंडणी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 13, 2022

बार्शी पोलिसांत फिर्याद : खंडणीखोरांनी हप्त्यासाठी जीवे मारण्याची दिली धमकी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी : खडी क्रशर चालविण्यासाठी पाच लाखांची मागणी करणाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. खंडणीखोरांनी आरोपींना मारहाण करून ५०हजार रुपये उकळले आणि पुढील महिन्यात ५० हजार रुपये हप्ता तयार ठेव तो कसा घ्यायचा तो आम्ही बघून घेऊ, अशी धमकी देऊन निघून गेले. ही घटना ११ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली.

प्रतिष्ठित व्यापारी सुनील भराडिया यांनी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार समाधान (खरे नाव माहिती नाही) याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

भराडिया यांच्या मुलाने बार्शीमध्ये खडी मशीन क्रेशर सुरू केले आहे. आरोपीने पाच लाख रुपयांची खंडणी मागितली असून, पहिला हप्ता ५० हजार रुपये दोघेजण घेऊन गेले आणि पुढील महिन्यात ५० हजार रुपये घेण्यासाठी येतो, ही रक्कम कशी घ्यायची ते आम्ही बघून घेऊ. तू मला वेड्यात काढू नको, तू आज नाही भेटला, तर उद्याचा दिवस पाहू शकणार नाही, अशी धमकी दिली.

भराडिया क्रश मशिनच्या ऑफिसमध्ये थांबले असताना खंडणीखोर तेथे रात्री साडेदहाच्या सुमारास आले, तुझ्या खडी क्रशरचे प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणाला. माझी खडी मशीन कायदेशीर असून, माझ्याकडे रितसर कागदपत्रे आहेत, असे सांगितले. त्यावेळी खंडणीखोरांनी टेबलवरील कागदपत्र फेकून दिले आणि गचांडी धरून पैसे दे नाही, तर तुला खल्लास करीन अशी धमकी दिली. त्याच्यासोबतची व्यक्तीदेखील मारण्यासाठी अंगावर धावून आला. त्यावेळी जीवाला धोका नको म्हणून ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ५० हजार रुपये काढून दिले. या प्रकारामुळे मी घाबरून फिर्याद दिली नाही. मात्र, त्यानंतर स्वतःला सावरत १२ फेब्रुवारी २०२२ रोजी बार्शी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार खंडणी मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();