आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 22, 2021

खडकी पोलिसांची कामगिरी : पिस्टल, मॅग्झीन, दोन जिवंत काडतुसे असा ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या तिघांना खडकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून गावठी पिस्टल, मॅग्झीनसह दोन जिवंत काडतुसे, एकूण ३७ हजार रुपये, तसेच दाखल गुन्ह्यात दोन पिस्टल ४ राऊंड असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

धनाजी ऊर्फ धना दिलीप रुपनर (वय २३, रा. रामचंद्र काळेनगर, लेन नं.३, खांदवेनगर, लोहगाव, पुणे), अनिकेत राजेंद्र डिचोलकर (वय २३, रा. वडारवस्ती, साईबाबा मंदिरामागे, लेन नं.१, कर्वेनगर, पुणे) आणि श्रीनाथ संजय वाघमारे (वय २४, रा. भीमनगर, कर्वेनगर, कोथरूड, पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील रेंजहिल्स फुटबॉल ग्राऊंड येथे एक व्यक्ती पिस्तुल घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी आरोपींकडे गावठी पिस्टल, मॅग्झीनसह दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३७ हजार रुपये, तसेच दाखल गुन्ह्यात दोन पिस्टल ४ राऊंड असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी पुढील तपास करीत आहेत.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षिका संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी, सहायक पोलीस फौजदार तानाजी कांबळे, पोलीस नाईक राजकिरण पवार, उद्धव कलंदर, संदेश निकाळजे, पोलीस शिपाई जहाँगीर पठाण, अनिरुद्ध सोनवणे, भगवान हंबर्डे, स्वप्नील घोलप, विलास शेवाळे यांच्या पथकाने विशेष कामगिरी केली.

get_footer();