आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बेल्हे शहर युवक राष्ट्रवादी अध्यक्षावर हल्ला करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 21, 2021
02 09 2021 News 1
Spread the love

राजकीय वैमनस्यातून घडला प्रकार : आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध फिर्याद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बेल्हे (जि. पुणे) येथे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम चाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना शुक्रवारी (दि.19) सकाळी घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती की राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला याचा शोध पोलीस घेत आहेत.

याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात चाटे यांचे चुलत भाऊ साहेबराव धनंजय चाटे यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी एकनाथ चाटे हे दुचाकीवरुन आळेफाटा येथील काम उरकून बेल्हे येथे घरी जात होते. त्यावेळी त्यांचे चुलत भाऊ साहेबराव चाटे याने त्यांचा पाठलाग केला. राजुरीच्या पुढे आल्यानंतर स्वामी कृपा लॉन्स मंगल कार्यालय समोरील हायवे रोडकडे जात असताना अचानक त्यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूस जोरात लोखंडी रॉडने मारले. त्यामुळे ते दुचाकीवरुन जमिनीवर पडले. त्यावेळी त्यांना चुलत भाऊ साहेबराव सोबत दोन अनोळखी इसम हातात लोखंडी रॉड घेऊन उभे असल्याचे दिसले. या घटनेत ते गंभीर जखमी होऊन जागेवरच बेशुद्ध झाले. त्यांना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांत्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

21 11 2021 news 10
get_footer();