आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भाड्याच्या घरातून काढून टाकल्याने केला विवाहितेचा खून

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 8, 2022

विमानतळ पोलिसांत फिर्याद : लोहगावमधील संत तुकारामनगरमध्ये घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भाड्याच्या घरातून काढून टाकल्याच्या रागाने विवाहितेचा खून करून घराला कुलूप लावून पळून गेला. लोहगावमधील संत तुकाराम महाराज मंदिराजवळ ६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी तीन ते रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली.

रघुनाथ सूर्यवंशी (वय ४२, रा. लोहगाव, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीकडे भाडेकरू होता, त्याचे पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यानंतर पत्नीने फिर्यादीला यापुढे कोणतेही अनैतिक संबंध ठेवणार नाही, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने भाडेकरूला रूममधून काढून टाकले. त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या पत्नीचा गळा आवळून खून केला आणि घराला कुलूप लावून पळून गेला. विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप पुढील तपास करीत आहेत.

get_footer();