आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भाजी मंडईमध्ये खिशातील मोबाईल चोरणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 12, 2022

हडपसर पोलिसांत फिर्याद : मांजरी बुद्रुक येथे म्हसोबा मंदिराजवळ घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मोटारसायकलवरून पाठलाग करीत नाही, तर पाठीमागून जवळ जाऊन मोबाईल चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. मांजरी बुद्रुक येथील म्हसोबा मंदिरासमोरील भाजी मंडईजवळ भाजी खरेदी करीत असताना दुचाकीवरील चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. मांजरी बुद्रुकमधील म्हसोबा मंदिरसमोरील भाजी मार्केटमध्ये ६ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोबाईल चोरीची घटना घडली.

दत्ता बोईनवाड (वय ३२, रा. हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मांजरी बुद्रुकमधील म्हसोबा मंदिरासमोरील भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करीत होते. त्यावेळी मोटारसायकलवरील दोन चोरटे खिशातून मोबाईल चोरून पळून गेले. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गाडेकर पुढील तपास करीत आहेत.

get_footer();