आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भरधाव मिक्सरच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 28, 2022

हडपसर पोलिसांत फिर्याद : हडपसर उड्डाण पुलावर झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाले. हडपसर उड्डाण पुलावर २५ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

रवींद्र विमण्णा कोळी (रा. ट्युडुस सोसायटी, मांजरी फार्म, सोलापूर रस्ता, हडपसर, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.
सुरेश शिवाजी रायते (वय २३, रा. लोणकर हॉलशेजारी, मुंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव असून, राहुल ताटे (वय २८, रा. चऱ्होली बुद्रुक, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे दाजी हडपसरहून २५ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मावस बहिणीला मोटारसायकलवरून घेऊन जात होते. त्यावेळी हडपसर उड्डाण पुलावर भरधाव मिक्सरच्या ट्रकची दुचाकीस धडक बसून अपघात झाला. या अपघातात रवींद्र विमण्णा कोळी यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर मावस बहीण जखमी झाली आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();