आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 14, 2022

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सोलापूर रस्त्यावर उरुळीकांचन येथे झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर रस्त्यावर उरुळी कांचन येथे ११ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.

मनोज बापू मोरे (वय २२, रा. कडवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बापू मोरे (वय ४०, रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा मुलगा मोटारसायकलवरून जात होता. त्यावेळी टेम्पोची दुचाकीला धडक बसून अपघात झाला. या अपघातात मनोज मोरे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

get_footer();