आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भोंदू बाबाचा सल्ला; पत्नी अनैसर्गिक संबंध

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 11, 2021

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये भोंदूबाबासह सात जणांवर गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

विवाहितेला भोंदूबाबाकडे नेल्यानंतर त्या बाबाने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत पत्नीला पतीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला. पतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर विवाहिता वेडसर असल्याचे सांगत तिची बदनामीही केली.

याप्रकरणी येरवडा येथील आसिफ बाबा याच्यासह पती व त्याच्या इतर नातेवाईक अशा 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात 24 वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार कौटुंबिक छळ, अनैसर्गिक अत्याचार, विनयभंग, जादूटोणा विरोधी कायदा या कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी सांगितले की, विवाहितेचे व आरोपी पती एकाच ठिकाणी काम करण्यास होते. त्याठिकाणी या दोघांची ओळख झाली. त्यातून त्यांची मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबाच्या परवानगीने रितिरिवाजने विवाह देखील केला. त्यानंतर मात्र आरोपीने एकदिवस मेकअप नीट न केल्याच्या कारणावरून वाद घालत मारहाण केली. तेथून पीडित महिलेच्या छळाला सुरुवात झाली. तिचा पगार देखील जबरदस्तीने घेतला जात होता.

get_footer();