आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ब्लँकेटरुपी ऊब मिळाल्याने त्यांचा चेहरा फुलला

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • January 10, 2022

शेरला परिवार : बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि पदपथावर राबविला उपक्रम

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना आणि कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पदपथावरील गरजूंना शेरला परिवाराच्या वतीने ब्लँकेट, एन-९५ मास्क, सॅनिटायजर देऊन आधार दिला.

ब्लँकेटरुपी ऊब मिळाल्याने त्यांनी शेरला परिवाराचे आभार मानले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पैशात मोजता येत नाही, अशी भावना शेरला परिवाराने व्यक्त केली.

गुलटेकडी एकता प्रतिष्ठान व भाजपा झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष गणेश शेरला यांच्या वतीने गरजूंना ब्लँकेट, सॅनिटायझर व एन-९५मास्कचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी महिला अध्यक्ष स्वाती शेरला, डॉ. प्रसाद खंडागळे, रोहन कोतुरे, सागर निंबाळकर, प्रमोद पडवळ, महेश सांळुके, राहुल जाधव व प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

get_footer();