आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खूनाचा प्रयत्न करून पळून गेलेल्या दोघांना केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 22, 2022

कोंढवा पोलिसांची कामगिरी : कर्नाटक आणि सोलापूरमधून घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : खुनाचा प्रयत्न करून पळून गेलेल्या दोन आरोपींना कर्नाटक व सोलापूर येथून कोंढवा पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी गुन्हा केल्यानंतर कर्नाटक व सोलापूर येथे पळून गेले होते. पोलिसांनी सूत्रांच्या माहितीआधारे शोध घेऊन अखेर दोघांच्या मुसक्या आवळल्या.

अविनाश ऊर्फ ताऊ अर्जुन जोगण (वय २३, रा. अपर इंदिरानगर, शेळकेवस्ती, कोंढवा, पुणे) आणि वैभव सुभाष डबकरे (वय २३, रा. शेळकेवस्ती, कोंढवा खुर्द, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

कोंढवा पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकप्रमुख अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार सहायक पोलीस फौजदार असगरअली सय्यद, योगेश कुंभार, गणेश चिंचकर, अभिजित रत्नपारखी, दीपक जडे, अमोल बिरवे, महेश राठोड यांच्याकडून तपास सुरू होता.

दरम्यान आरोपी अविनाश ऊर्फ ताऊ अर्जुन जोगण कर्नाटक कलुर्बगी आणि वैभव सुभाष डबकरे सोलापूर येथे नातेवाईकाकडे पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार कलुर्बगी येथून अविनाश ऊर्फ ताऊ अर्जुन जोगण आणि सोलापूर येथून वैभव सुभाष डबकरे या दोघांना अटक केली. परिमंडल-५चे पोलीस उपायुक्त आणि वानवडी विभागाचे सहायक पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

पोलीस उपायुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

get_footer();