आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बोपदेव घाटात लूटालूट करणारे चार अल्पवयीन ताब्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 14, 2021

कोयत्याच्या धाकाने लुटले : पोलीस चौकीचे कामकाज सुरू होण्याआधीच घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बोपदेव घाटात प्रवाशांना लूटण्याच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर नव्याने घाटाच्या पायथ्याशी चौकी बांधण्यात आली आहे. मात्र चौकीचे कामकाज सुरु होण्याआधीच तेथे पुन्हा एकदा प्रवाशांना लोखंडी कोयत्याने मारहाण करत लूटण्याची घटना घडली.

पोलिसांनी तातडीने हालचाल करत चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. फिर्यादी विक्रांत गारगोटे (वय २७, रा. राजगुरुनगर) हे दुचाकीवर त्यांच्या मित्रांसमवेत फिरायला बोपदेव घाटात आले असता, रात्रीच्या सुमारास ते बोपदेव घाटातून पुण्याच्या दिशेने येत असताना त्यांना चार अल्पवयीन मुलांनी अडवले व त्यांना कोयत्याने मारहाण करुन धाक दाखवत फिर्यादीच्या मित्राचे पाकिट जबरदस्तीने चोरले. पाकिटात दोन हजाराची रोकड होती. ही घटना गुरुवारी रात्री घडली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणाच तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करत आहेत.

get_footer();