आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बोपदेव घाटात मुलीच्या फोनने मदतीसाठी गेला आणि टोळक्याने धुतला;

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 23, 2021

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : पुरुषांमध्ये स्त्रीदाक्षिणात्य मोठ्या प्रमाणावर असते. एखादी मुलगी अडचणीत असेल, तर तिच्या मदतीसाठी धावणार्‍यांची संख्या कमी नसते. अशाच एका मुलीने केलेल्या फोनवरुन मदतीला धावलेल्या तरुणाला टोळक्याने चांगलाच धुतला. या मारहाणीत त्याच्या करंगळीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. बोपदेव घाटात अर्ध्यावरील एस वळणावर शुक्रवारी दुपारी 2 वाजता हा प्रकार घडला.

याप्रकरणी कासीम इस्माईल शेख (वय 23, रा. आश्रफ नगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद शेख, समीर शेख, फैज शेख, इम्रान शेख, इन्नू व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कासीम शेख एका गॅरेजमध्ये काम करतात. मोहम्मद शेख व समीर शेख यांनी एका मुलीच्यामार्फत फोन करून तिची अ‍ॅक्टीवा गाडी बंद पडली असल्याने दुरुस्तीसाठी बोपदेव घाटात बोलावून घेतले. या फोनवरुन दिलेल्या ठिकाणी मदतीसाठी शेख गेले. त्यावेळी तेथे हे टोळके त्याची वाटच पहात होते. मोहम्मद शेख हा कासीमला म्हणाला की ‘‘उस दिन मेरे को सळी से मारता क्या, कितने दिन भागेगा आया ना, अभी अब जा के बता’’ असे म्हणून त्याला बांबुने दोन्ही पायावर, हातावर, कमरेवर, डोक्यात मारुन जबर जखमी केले. या मारहाणीत त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. आरोपींनी जाताना त्याला ‘‘तू किधर कंप्लेट करेगा, तो तेरे को गायब करेंगे’’ अशी धमकी दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे तपास करीत आहेत.

get_footer();