आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लोणीकंदमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Political, Previous Issue, Social • April 12, 2023

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत वाडेबोलाई रस्त्याजवळील सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना अटक केली आहे.

लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अंमलदार योगेश मांढरे व नितीन जगदाळे यांना मिळालेल्या माहितीनुसार सबंधित भागात सापळा रचून विजय शेलार वय वर्षे 28 आणि दीपक मोहिते वय वर्ष 21 यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. हे दोघेही नाशिक जिल्ह्यातल्या अनुक्रमे वराळे आणि दळेगाव गावातले रहिवासी आहेत. त्यांच्याकडून 4 लाख 24 हजार किंमतीचा 21 किलो 200 ग्रॅम गांजा, 20 हजार रूपये किंमतीचे 2 मोबाईल, एक मोटर सायकल असा सुमारे 4 लाख 59 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
या दोघांवर लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त रितेशकुमार, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त रामनाथ पोकळे, अमोल झेंडे, गुन्हे शाखेचे सहा. पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली विरोधी पथक 2 चे अधिकारी पो. नि. सुनिल थोपटे, पो.उप निरीक्षक दिगंबर चव्हाण, शुभांगी नरके सहायक पोलिस फौजदार शिवाजी घुले, पोलीस अंमलदार
योगेश मांढरे, संतोष देशपांडे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, अझीम शेख, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड यांनी केली.

get_footer();