आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बॉयफ्रेंड बनवण्याच्या नादात तब्बल 73 लाखाला लावला चूना

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 18, 2021

सायबर पोलिसांत गुन्हा दाखल : डेटिंग वेबसाईटवरील भेटीचे झाले रुपांतर प्रेमात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ऑनलाइन फ्रॉडची एक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने तरुणीला 73 लाख रुपयांचा चूना लावला आहे. एका डेटिंग वेबसाइटवर दोघांची भेट झाली होती. तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

अशी सुरू झाली फसवणुकीची प्रेमकथा : पीडित तरुणी पुण्यातील वाकड परिसरात राहते. याच वर्षी जूनमध्ये डेटिंग वेबसाइटवर तरुणीची एका तरुणासोबत भेट झाली होती.

यानंतर दोघांनी आपसात नंबर एक्सचेंज केला आणि चर्चा सुरू झाली.

तरुणाने तरुणीला दिले हे आश्वासन : काही दिवसांपर्यंत दोघांमध्ये चर्चा सुरू होती आणि नंतर दोघांमध्ये प्रेम झाले. मुलाने तरुणीला सांगितले की तो परदेशात राहतो. त्याला लवकर भारतात सेटल व्हायचे आहे. तरुणाने तरुणीला हे सुद्धा आश्वासन दिले की तो तिच्याशी लग्न करणार आहे. तरुणीचा सुद्धा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला.

त्यानंतर एक दिवस मुलाने मुलीला फोन केला आणि म्हटले की मी एयरपोर्टवर आहे. कस्टम डिपार्टमेंटने मला पकडले आहे. माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत. जर मी दंड भरला नाही तर माझ्याविरूद्ध केस दाखल होईल. मुलाने तरुणीला सांगितले की दंड भरण्यासाठी ताबडतोब 73 लाख रुपये पाठव. बॉयफ्रेंड संकटात सापडल्याचे पाहून मुलीने वेगवेगळ्या अकाऊंटवरून 73 लाख रुपये ट्रान्सफर केले आणि मुलाला विश्वास दिला की त्याला काहीही होणार नाही. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तरुणाने तरुणीशी संपर्क बंद केला. यानंतर तरुणीने त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली.

get_footer();