आवृत्ती पुणे
← Back to Homepage

क्रेडीट कार्डद्वारे 3.2 लाखाची फसवणूक करणाऱ्या चार परप्रांतीयावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 31, 2021

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क


क्रेडीट कार्डद्वारे फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगाल, गुजरात आणि आंध्र प्रदेशातील बँक खातेधारकांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आरोपींनी 3 लाख 19 हजार 806 रुपयांची फसवणूक केली आहे.

मोनाफल्ली शेख (रा. वेस्ट बंगाल), रजपुत शिवकुमार रनविजय (रा. सुरत, गुजरात), समीर अक्तर, लोया साई किशोर (रा. आंध्रप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महेश आनंदा कामठे (वय-32 रा. तिरंगा चौक, भारती विद्यापीठ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्याकडे कोटक महिंद्रा बँकेचे क्रेडीट कार्ड व स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडीट कार्ड आहेत. ते दोन्ही क्रेडीट कार्डसची सर्व डिटेल्स क्रेड अ‍ॅप या अ‍ॅपवर अपलोड करुन त्याद्वारे सर्व पेमेंट करतात. त्यांनी अ‍ॅपवरुन बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यातून 89 हजार 949 रुपयांची रक्कम भरली होती. पैसे भरल्यानंतर फिर्यादी यांना कोणताही एस.एम.एस आला नाही. त्यांनी अ‍ॅपच्या कस्टमर केअर क्रमांकावर साधला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने ईमेल आयडी दोन्ही बँकेच्या क्रेडीट कार्ड वरील कार्ड नंबर, कार्डची एक्सपायरी डेट व गुगल सिक्युरिटी कोड अशी माहिती भरण्यास सांगितले. माहीती क्रेड अ‍ॅपवरील अ‍ॅड्रेस मेन्यु मध्ये टाईप करुन भरताच त्यांनी फिर्यादीच्या जी मेल अकाउंट पासवर्ड त्याच्याकडील मोबाईल रिसेट करण्यास सांगितले. आरोपींनी मोबाईल फोन आणि जी मेल अकाउंट हॅक करुन त्याद्वारे फिर्यादी यांचे 3 लाख 19 हजार 806 रुयांची रक्कम काढून घेतली.
पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

get_footer();