आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज

maharashtra jain warta • News Slider, Political, Previous Issue • January 3, 2022

संजय नहार : अण्णा भाऊ साठे सभागृहात जाणिव पुरस्कार व बक्षीस वितरण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : देशातीलच नव्हे, तर जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुद्धांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे मत संजय नहार यांनी व्यक्त केले.

अण्णा भाऊ साठे सभागृहात जाणिव पुरस्कार वितरण व बक्षिस समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, उद्योजक अतुल बहुले, भंते सुमेधबोधी, संदीप काळे, सचिन अंबाडे, वैभव छाया, नितीन शेलार, निलेश अल्हाट, प्रशांत पवार, संजय भैलुमे गौरव जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी जयंती मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे, अभिनेता ऋतुराज वानखेडे, डॉ. अमोल देवळेकर, गायिका शीतल साठे, लोकशाहीर सचिन माळी यांचा मान्यवरांच्या हस्ते जाणिव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, तळागाळामध्ये काम करणाऱ्यांचा सामाजिक जाणिव पुरस्कार, बुद्ध पौर्णिमानिमित्त आयोजित बुध्दरूप सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

स्वरगंधार संगीत संस्था, पर्वती प्रतिष्ठान, मैत्री ग्रुप, भाऊसाहेब आव्हाड, नवनीत अहिरे, किरण साबळे, कुशल शिंदे, रवींद्र जाधव, धर्मा गरड, वैभव वांधरे, विकी शिंदे, रवी गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

जाणिव फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे यांनी प्रास्ताविक केले. कवी गोपाळ कांबळे व प्रा. स्वाती रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल ननावरे यांनी आभार मानले.

get_footer();