आवृत्ती पुणे

गँगस्टर बंडु आंदेकर याला खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी

भवानी पेठेतील अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून घेत होता भाडे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गँगस्टर व आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडु आंदेकर याला भवानी पेठेतील जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर बेकायदा बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून त्यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली … Read more

सूर्यदत्तमध्ये अल्पसंख्याक हक्कांवर विशेष परिसंवाद

मूल्यधिष्ठित शिक्षणातून जबाबदार नागरिक घडवण्याचा सूर्योदय : डॉ. संजय चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : केवळ पदवी संपादन करणे म्हणजे खरे शिक्षण नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्कांचा सन्मान राखणे आणि भारतीय संविधानाप्रती निष्ठा ठेवणे, हाच शिक्षणाचा खरा गाभा असल्याचे प्रतिपादन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले. सूर्यदत्त … Read more

दोघा वाहनचोरांना पकडून ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

वाघोली ते शेवगाव-नेवासा रोडपर्यंत १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे काढला माग महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाघोली येथील रॉयल इनफिल्ड बुलेट चोरीच्या दुचाकीचा तपास करताना पोलिसांनी वाघोली ते शेवगाव-नेवासा रोडपर्यंतच्या तब्बल १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मागोवा घेत दोघा सराईत वाहनचोरांना जेरबंद केले आहे. वाघोली पोलिसांनी ३ वाहने जप्त केली आहेत. रामेश्वर अंकुश धनगर (वय २८, रा. गणेशनगर, पैठण, … Read more

सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे उपमुख्याध्यापक रामकृष्ण इंगळे यांच्या शुभहस्ते थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. गणित … Read more

सूर्यदत्त हॉटेल मॅनेजमेंटचा ‘मेक द केक’ अभिनव उपक्रम

नववर्ष व विविध कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांची अनोखी संकल्पना: केक मेकिंग कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सूर्यदत्त हॉटेल मॅनेजमेंट एंटरप्रेन्योरशिप क्लबच्या वतीने ‘मेक द केक’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देत नागरिकांनाही व्यावसायिक केक बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार आहे. … Read more

दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या २०१ वाहनचालकांवर कारवाई

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नववर्षाचे स्वागत करताना ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले जाते. त्यानंतर दारूच्या नशेत वाहन चालवल्याने अपघात घडतात. अशा वाहनचालकांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक शाखेने तीन दिवस नाकाबंदी करून तपासणी करत २०१ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. वाहतूक शाखेने १९ ते २१ डिसेंबर या तीन दिवसांत शहरातील विविध भागांमध्ये ३० ठिकाणी … Read more

ज्येष्ठ नागरिकाला लुटणारा चोरटा जेरबंद

रामटेकडी परिसरातील निर्जन रस्त्यावर चौघांनी मारहाण करून केली होती लूट : वानवडी पोलिसांची यशस्वी कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रामटेकडी परिसरात निर्जन रस्त्यावरून जाणाऱ्या एका वयोवृद्ध नागरिकाला अडवून चौघांनी मारहाण करत लुटल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील एका चोरट्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. उमर नूर खान (वय १८, रा. नवाधिश पार्क, कोंढवा) … Read more

अपघात झाल्याचे कारण सांगून नुकसानभरपाईच्या नावाखाली कारचालकाला लुटले

सिंहगड रस्त्यावरील घटना : गळ्यातील ३ लाखांची सोनसाखळी हिसकावली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अपघात झाल्याची बतावणी करून नुकसानभरपाईच्या नावाखाली कारचालकाला लुटण्यात आल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरात घडली. दुसऱ्या कारमधील चोरट्यांनी धमकावून तक्रारदार कारचालकाच्या गळ्यातील ३ लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका कारचालकाने नांदेड … Read more

भूमच्या नगराध्यक्षपदी संयोगिता गाढवे यांची निवड

अटीतटीच्या लढतीत १९८ मतांनी विजय : १४ हजारांहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत अलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या संयोगिता गाढवे यांनी १९८ मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी जनशक्ती भूम शहर विकास आघाडीच्या उमेदवार सत्वशीला थोरात यांचा पराभव केला. पालिका निवडणुकीसाठी एकूण १८ हजार … Read more