आवृत्ती पुणे

गॅस कनेक्शन कट करण्याची भीती दाखवून २३ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्याने औंधमधील ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गॅस कनेक्शन कट करण्याची भीती दाखवत औंध परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्याने २२ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ८७ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ व ८ डिसेंबर २०२५ रोजी घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या … Read more

लातूर–अहिल्यानगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गा च्या मार्गासाठी कळंब येथे निर्णायक बैठक

शिराढोण–कळंब–जामखेड मार्गावरून महामार्ग जावा, यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांची एकजूट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : लातूर–अहिल्यानगर–कल्याण हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असून, या महामार्गाचा मार्ग ठरवताना जनहिताचा विचार होणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हा महामार्ग शिराढोण–कळंब–पारा–ईट–खर्डा–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण या मार्गावरूनच जावा, या प्रमुख मागणीसाठी कळंब येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली … Read more

‘पुढे साहेब आहेत, गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून ठेवा’

मोफत वस्तूचे आमिष दाखवून ७२ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेची दोघांनी केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुढे साहेब लोक आहेत, तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून बॅगमध्ये ठेवा, अशी बतावणी करत दोघांनी ७२ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेला मोफत वस्तूचे आमिष दाखवत १ लाख २० हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले. याबाबत एका ७२ वर्षांच्या महिलेने चंदननगर … Read more

‘लाच लुचपत’ ने पोलीस हवालदारासह खासगी व्यक्तीला केली अटक

जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी साक्षीदाराकडून मागितली होती लाच : जेजुरीत कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सावकारीच्या कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर न राहिल्याने पती-पत्नीच्या नावाने जामीनपात्र वॉरंट निघाले होते. हे वॉरंट बजावण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले होते. वॉरंट दाखवून ते रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक … Read more

प्रा. डॉ. संजय बी. चोरडियांचा ‘आयकोनिक पुणेकर पुरस्कार २०२५’ ने गौरव

पुणे टाइम्स मिरर व सिव्हिक मिरर यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान: डॉ. किरण बेदी व अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना प्रतिष्ठित ‘पुणे टाइम्स मिरर आयकोनिक पुणेकर पुरस्कार २०२५’ … Read more

मुंढव्यातील सोसायटीमध्ये दिसला बिबट्या

नागरिकांमध्ये घबराट : वन विभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील उपनगरांमधील अनेक ठिकाणी बिबटे आढळून येत असल्याचे सांगितले जात आहे. विमानतळावरील बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले असतानाच, गुरुवारी पहाटे मुंढव्यातील केशवनगर भागातील एका सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या आढळून आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मुंढव्यातील केशवनगर … Read more