आवृत्ती पुणे

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

फसवणुकीचा गुन्हा न दाखल करण्यासाठी मागितली होती लाच : बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फसवणुकीसंदर्भातील तक्रारीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. संदीप खेडकर (रा. गंगा समृद्धी अपार्टमेंट, वानवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे … Read more

जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर ‘लेझर स्पीड कॅमेरे’

लोणावळा, वडगाव मावळ येथे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे–मुंबई जुन्या महामार्गावर वडगाव मावळ व लोणावळा येथे अत्याधुनिक लेझर स्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. महामार्गावर होणारे बहुतांश अपघात वेग आणि वाहनचालकांच्या चुकांमुळे घडतात. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई तसेच अपघात रोखण्यासाठी वाहतूक … Read more

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दीड वर्षांनी हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केट आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास ४० टक्के नफा मिळेल, असे सांगून सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची तब्बल १२ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार … Read more

विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथे मेट्रो मार्गिका तसेच दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतुकीत करण्यात आलेले बदल रद्द करण्यात आले आहेत. परिणामी पाषाण, बाणेर आणि अभिमानश्री सोसायटी रस्त्यांवरील एकेरी वाहतुकीचे आदेश मागे घेऊन पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका … Read more

माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

धाडसी पोलीस सेवा व सामाजिक कार्याचा गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘सितारा महिला विकास संस्था’ यांच्या वतीने आयनॉक्स, कोरेगाव पार्क येथे आयोजित राज्यस्तरीय ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार सोहळ्यात माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पोलीस दलात ‘सिंघम’ म्हणून ओळख असलेल्या आंधळकर यांनी एलसीबी, पुणे ग्रामीण येथे कार्यरत … Read more

आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : विद्या विकास मंडळ पाथरूड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे महिला कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “आधुनिक महिला पुढील आव्हाने” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. ज्योती मांडोत (डुंगरवाल) यांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी आजच्या आधुनिक महिलांना शिक्षण, … Read more

एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

मध्य प्रदेशातील खाणीमध्ये एका महिन्यात २६७ बोगस कामगार दाखवून फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मध्य प्रदेशातील खाणीमध्ये काम करणाऱ्या सुमारे ९०० कामगारांच्या वेतनपत्रकात जानेवारी २०२६ महिन्यात २६७ बोगस कामगार दाखवून कंपनीची सुमारे १ कोटी २ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या मानव संसाधन व्यवस्थापकाविरुद्ध (एचआर मॅनेजर) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात … Read more

दृष्टिहीनांसाठी स्व. नितीनभाई देसाई यांच्या कार्याचा वसा पुढे नेणार – डॉ. राजेश शहा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरीभाई व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जन्मतःच दृष्टिहीन असूनही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ‘नारी शक्ती – अंतर्दृष्टी विशेष सन्मान’ कार्यक्रमाद्वारे गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम ७ मार्च २०२६ रोजी शिकारपूर सोशल … Read more

‘‘तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात’’ म्हणत तरुणीचा धरला हात

विनयभंग करणाऱ्या पोर्टर डिलिव्हरी बॉयला शिवाजीनगर पोलिसांनी केले गजाआड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन वस्तू मागवताना डिलिव्हरी देण्यासाठी येणारी व्यक्ती कोण असेल आणि तिची वृत्ती कशी असेल, याची माहिती ग्राहकांना नसते. अनेक तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून प्रामाणिकपणे काम करत असले तरी काहीजण चुकीच्या हेतूने महिलांशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. शिवाजीनगर गावठाण परिसरात शुक्रवारी … Read more

बुधवार पेठेत पुन्हा ४ महिलांसह ५ बांगलादेशींवर कारवाई

महिलांना वेश्या व्यवसायाला लावणाऱ्या पापा भैय्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल : कुंटणखानाचालकास अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आणखी ४ महिला व एक पुरुष असे ५ बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे आढळून आले आहे. फरासखाना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. ब्युटी पार्लर व टेलरिंगचे काम देण्याच्या नावाखाली बांगलादेशातून पुण्यात … Read more