आवृत्ती पुणे

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट ४ची कामगिरी : साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे स्टेशनला जाण्यासाठी येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात थांबलेल्या एका व्यक्तीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून चौघांनी त्याचे अपहरण करून मारहाण व लुबाडणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४च्या पथकाने तिघांना अटक केली असून सुमारे ७ … Read more

सुवर्ण कारागिराला डांबून ठेवणाऱ्या दुकानदाराला अटक

गणेश पेठेतील घटना : पगार व सोने मागितल्याने दुकानमालकाचे कृत्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेल्या पाच वर्षांपासून काम करणाऱ्या सुवर्ण कारागिराने २०२४ पासून जमा झालेला पगार आणि कामाचे सोने मागितल्याने दुकानमालकाने त्याला डांबून ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दुकानमालकाला अटक केली आहे. सुखदेव दास (वय ३८, रा. विटेकर बिल्डिंग, … Read more

प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रियकराला लक्ष्मीनगर पोलिसांकडून अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लग्न ठरल्यामुळे तरुणीने प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरून तिच्या प्रियकराने तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाने तरुणीच्या होणाऱ्या पती व त्याच्या नातेवाईकांना प्रेमसंबंधांतील फोटो पाठवून तिचे लग्न मोडले. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी आरोपी … Read more

तळीरामांची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतली शाळा

रस्ता सुरक्षा अभियान, ४० टक्के अपघात कमी करण्याचा निर्धार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांची सोमवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शाळा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत या तळीरामांना सज्जड दम दिला. यापुढे मद्यप्राशन करून वाहन चालविणे लक्षात राहील, अशी कारवाई करण्याचा इशारा दिला. रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत समुपदेशन व … Read more

संस्कार बालक मंदिर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते समर्थ नगर येथील संस्कार बालक मंदिर शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्कार बालक मंदिर शाळेच्या वतीने नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांचा यथोचित सन्मान करण्यात … Read more

दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु दुकान फोडणारा गुन्हेगार जेरबंद

आंबेगाव पोलिसांनी तीन गुन्हे आणले उघडकीस, सव्वा लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु या दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. ओमकार मारुती देडे (वय २१, रा. किरकटवाडी, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला … Read more

हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांनी हॉटेल मालकाच्या नावाने व्हॉटसअॅप मेसेज करून केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडगार्डन परिसरातील मंगलदास रोडवरील हॉटेल कॉनरॉडचे मालक संदीप रहेजा यांच्या नावाने व्हॉटसअॅप मेसेज करून सायबर चोरट्यांनी हॉटेलच्या फायनान्स संचालकाला २० लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याबाबत हॉटेल कॉनरॉडचे फायनान्स संचालक बीपलब चक्रबोरती (वय ५४, रा. … Read more