आवृत्ती पुणे

एटीएसची पुणे रेल्वे स्टेशन परिसरात मोठी कारवाई

दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेला संगणक अभियंता गजाआड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंता तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. एटीएसने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी आणि खडकी परिसरात छापे टाकले होते. या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यात वास्तव्यास असलेल्या त्या संगणक अभियंत्याला अखेर गजाआड … Read more

मारणे टोळीतला रुपेश मारणे अटक

मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून जेरबंद : ९ महिने होता फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आयटी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात तब्बल नऊ महिने फरार असलेला रुपेश मारणे याला पुणे पोलिसांनी मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका बंगल्यातून पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. शिवजयंतीच्या दिवशी अभियंता देवेंद्र जोग … Read more

वाशी तालुका कृषी सेवा केंद्र संघटनेतर्फे निवेदन सादर

महाराष्ट्र न्युज नेटवर्क वाशी : वाशी तालुका कृषी सेवा केंद्र संघटनेतर्फे तहसीलदार व कृषी अधिकारी वाशी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकी विक्रीसाठी साथी पोर्टल/ॲप व कीटकनाशके विक्रीसाठी प्रस्तावित ॲपला विरोध तसेच कृषी केंद्रांकरिता लागू असलेल्या अनावश्यक नियम व कारवाईविरुद्ध एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळण्याची घोषणा करण्यात आली. राज्य संघटनेच्या ‘माफक’ च्या आवाहनानुसार दिनांक २९ … Read more

गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ३७ लाखांची फसवणूक

नांदेड सिटीतील कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल, आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा हस्तांतरीत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ३७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करुन अंगठी नेली चोरुन

मंदिरात पैसे दान करायचे असल्याची भामट्याने केली होती बतावणी : सिंहगड रोडवरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नातेवाईक मयत झाले आहेत, मंदिरात पैसे दान करायचे आहेत, असे सांगून एका ७१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील १३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढायला लावून ती घेऊन भामटा पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत हिंगणे खुर्द येथे … Read more

तरुणांकडून सव्वा लाखांचा मेफेड्रॉन जप्त

खडक पोलिसांची मध्यरात्री कारवाई : स्वारगेटजवळ दोघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मॅफेड्रॉनची विक्री करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री कोणाची तरी वाट पाहत थांबलेल्या दोघांना खडक पोलिसांनी स्वारगेटजवळील स्वामी मंदिर परिसरातून रंगेहात पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल १ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) आणि एक कोयता जप्त केला आहे. अटक केलेल्यांची नावे अब्दुल अकबर खान … Read more

नितीन गुंजाळ यांची महाराष्ट्र पोलीस मित्र समिती भूम तालुका अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : आरसोली (ता. भूम) येथील नितीन श्रीधर गुंजाळ यांची महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या भूम तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड राज्य रक्षक संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या वतीने मागील आठवड्यात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य रक्षक संघाच्या माध्यमातून कार्यरत असलेली पोलीस मित्र समिती अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. … Read more

ऑनलाईन गेममधून दागिन्यांची खंडणी घेणारी टोळी गजाआड

शाळकरी मुलगा ठरला टारगेट, सर्वसामान्यांचे डोळे उघडवणारी घटना : शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या एका शाळकरी मुलाला गेमिंग आयडी देण्याचे आमिष दाखवून साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोघा आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून मुलांना फसवणाऱ्या टोळ्यांपासून पालकांनी सावध राहावे, असा इशारा … Read more

पूरग्रस्तांसाठी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था, पुणे यांचा मदतीचा हात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे/बार्शी : समाजसेवेची परंपरा कायम ठेवत समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था, पुणे तर्फे पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. भोसरी येथे झालेल्या संस्थेच्या बैठकीत बार्शी शहरातील सदस्य श्रीमती कविता खानापुरे यांनी बार्शी व माढा परिसरातील पूरस्थितीची माहिती देत शेतकरी पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी आवाहन केले. त्यांच्या या संवेदनशील आवाहनाला संस्थेच्या सर्व सदस्यांनी … Read more

महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणार : संयोगिता गाढवे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : येणाऱ्या काळात शासनाच्या विविध योजना आणून महिलांना स्वावलंबी करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहेत, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष संयोगिता संजय गाढवे यांनी दिली. भूम नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्यावतीने भूम शहरातील महिलांची संवाद बैठक साहिल मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. या बैठकीला … Read more