आवृत्ती पुणे

जाणीव फाऊंडेशनतर्फे महामानवांची संयुक्त जयंती व पुस्तके वाटप उपक्रम संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जाणीव फाऊंडेशनतर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रम व प्रेरणादायी ग्रंथवाटप उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसाव्या जयंतीनिमित्त सातारा रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने दोनशे शैक्षणिक व महापुरुषांवरील प्रेरणादायी पुस्तके वितरित करण्यात आली. सोशल मीडियाच्या … Read more

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या अदितीचा मृत्यू

चिन्मय हॉस्पिटलच्या डॉ. मुकुंद संगमनेरकर यांच्यासह ६ डॉक्टर व परिचारिकांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उपचार करताना प्रचलित मानकांचा अवलंब करण्यात आला नाही, तसेच रुग्णावर योग्य प्रकारे सतत देखरेख ठेवली गेली नाही. उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांची अदिती गिते हिचा मृत्यू झाला. अदिती गिते हिच्या मृत्यूप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चिन्मय हॉस्पिटलचे डॉ. मुकुंद संगमनेरकर … Read more

भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा

साडेसहा कोटींचा केला अपहार : बनावट दस्तऐवज तयार करून केली फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बनावट दस्तऐवज तयार करून भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लेखा परीक्षक सुनिल मथुरा … Read more

गॅस बिलाच्या नावाखाली दोघांची दीड लाखांची फसवणूक

एकाच दिवशी सायबर चोरट्यांनी एकाच कारणासाठी घातला गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गॅस बिल भरले नाही तर गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवत सायबर चोरांनी दोघांची १ लाख ४४ हजार ६०३ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मार्केटयार्ड आणि नर्‍हे पोलीस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोघांची गॅस कनेक्शन … Read more

काळभैरवनाथ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत पाणी वाटप

बार्शीच्या ओन्ली समाजसेवा संस्थेचा उपक्रम : उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दिवसभर सेवा महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने मोफत 400 जीआर पाण्याचे वाटप करण्यात आले. बुधवार, दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मोठ्या … Read more

पत्नीच्या नाकावर बुक्की मारुन हाड केले फ्रॅक्चर

फ्लॅट विक्री करण्यास दिला होता नकार : कोथरुडमधील घटनेत पतीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅट विक्रीस नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला मारहाण करून तिच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना कोथरुड परिसरात घडली आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार … Read more

एमडी ड्रग्जची विक्री करणारे दोन गुन्हेगार जेरबंद

वाघोली पोलिसांची कामगिरी : ऑडी कारसह ३१ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना वाघोली पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून एकूण ३१ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. योगेश सुभाष कणगरे (वय ३८, रा. शिवकृपा बिल्डिंग, साईनगर, लोहगाव) आणि सोनू सिंह ऊर्फ मनुवेंद्र ऊर्फ सोनू शंकर सिंह (वय … Read more

घरगुती गॅसच्या काळ्या बाजाराचा भंडाफोड

घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये करत होते गॅस ट्रान्सफर : काळेपडळ पोलिसांनी १०३ टाक्या केल्या जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इराण-अमेरिका युद्धामुळे गॅसची टंचाई निर्माण झाल्याने सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणावर बंधने आणली आहेत. त्याचा गैरफायदा घेत घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करून काळा बाजार करणाऱ्यास काळेपडळ पोलिसांनी रंगेहात पकडले. दुकानातून १०३ गॅस सिलेंडर … Read more

व्यावसायिकाचे अपहरण करून ५० लाखांची खंडणीची मागणी

खराडी पोलिसांनी काही तासांत खंडणीखोरांना पकडून व्यावसायिकाची केली सुटका महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खडी क्रशर प्लांट दाखविण्याच्या बहाण्याने मेट्रो प्रकल्पासाठी काम करणाऱ्या व्यावसायिकाचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना खराडी पोलिसांनी काही तासांत पाठलाग करून पकडले आणि व्यावसायिकाची सुटका केली. सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू … Read more