आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या चौघांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 17, 2022

कोंढवा पोलिसांत फिर्याद : बोपदेव घाटात घडली चोरीची घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बोपदेव घाटात चार अज्ञातांनी चाकूच्या धाकाने सहा हजार पाचशे रुपयांचे तीन मोबाईल आणि रोख एक हजार रुपये लुटून नेणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. बोपदेव घाटात १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

रामा थापा (वय २२, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी सिक्युरिटी गार्डचे काम करत असून, चुलतभाऊ अमन थापा (वय १८) व त्याचा मित्र सुरेंद्र थापा यांच्यासह मोटारसायकलवरून बोपदेव घाटातून सासवड रस्त्याकडे जात होते. त्यावेळी दुचाकीवरून चार अनोळखी व्यक्ती आले आणि भाऊ व मित्राला चाकूच्या धाकाने तीन मोबाईल व रोख रक्कम एक हजार रुपये असा एकूण सहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. कोंढवा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षिका चैत्राली गपाट पुढील तपास करीत आहेत.

get_footer();