आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चैन चोरी करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 14, 2022

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : दोन गुन्हे उघड, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे ग्रामीण भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दुचीकीवरुन येऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि चोरलेले सोन्याचे दागिने असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत करण्यात आली असून, दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

शाहरुख सलीम शेख (वय-22 रा. कदमवाकवस्ती ता. हवेली, जि. पुणे मुळ रा. मुरुड ता.जि. लातूर), हरीश किसन कोळपे (वय-21 रा. वाडेबोल्हाई ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शैलेश कुदळे व राजेश दराडे यांना दोन आरोपी कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आढळून आले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सोन्याचे दागिने शिरुर तालुक्यातील कोरेगाव गावच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून रांजणगाव पोलीस ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून 1 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना रांजणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुंखे, संभाजी देविकर, श्रीनाथ जाधव, राजेश दराडे, शैलेश कुदळे, बाजीराव वीर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();