आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चंदनाची तस्करी करणाऱ्यास केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 26, 2022

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : चंदनाचे चार ओंडके व ॲक्टिव्हा केली जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चंदनाची तस्करी करणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून चंदनाचे चार ओंडके सुमारे एक लाख रुपये किमतीचे आणि ॲक्टिव्हा ५० हजार रुपये असा एकूण एक लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

निलेश बाळू डोळस (वय ३०, रा. निगडी ओटा स्कीम, सेक्टर क्र.२२, मिलिंदनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखा युनिट-१चे पथकातील अधिकारी-कर्मचारी प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगारांचा तपास करीत होते. यावेळी ॲक्टिव्हावरून चंदनाच्या झाडाचा ओंडका विक्रीसाठी टिंबर मार्केट भवानी पेठ येथे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पोलिसांनी वनविभागाचे मंगेश सपकाळे, वनपरिमंडल अधिकारी लोणी काळभोर यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे नायलॉनच्या पोत्यामध्ये चंदनसदृश लाकडाचे चार ओंडके मिळून आले. चंदनाचे चार ओंडके सुमारे एक लाख रुपये किमतीचे आणि ॲक्टिव्हा ५० हजार रुपये असा एकूण एक लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, इम्रान शेख, मीना पिंजण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();