आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चौघे अट्टल चोर जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police • July 17, 2021

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : नऊ गुन्हे उघडकीस

पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे शहरात घरफोडी, वाहनचोरी आणि मोबाईल चोरी करणार्‍या चौघा अट्टल चोरांना पकडण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. संबंधित चौघांकडून एकूण नऊ गुन्ह्यांतून सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अटक झालेल्या चौघांपैकी तिघे जण नीलकमल सोसायटीच्या परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होते. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले. सौरभ गोपाल कुमरेली, (वय 21, रा. मांजरी खुर्द, पुणे), किरण काशीनाथ सूर्यवंशी ( वय 26, रा. दापोडी, पुणे, मूळ गाव- उजळंब, ता. व जि. उस्मानाबाद) आणि शुभम संतोष कांबळे (वय 22, रा. पाषाण, पुणे, मूळ गाव- बेंबळी, ता. व जि. उस्मानाबाद) अशी या तिघा मुख्य चोरट्यांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयामध्ये हजर करून रिमांडमध्ये घेण्यात आले. रिमांड मुदतीत अधिक तपास करून त्यांचा फरारी चौथा साथीदार प्रकाश विठ्ठल इरकल (वय 22, रा. वडावरवाडी, पुणे, मूळ गाव- विजापूर, कर्नाटक) यालाही विजापूर ह्या त्याच्या मूळ गावातून ताब्यात घेण्यात आले.
या चोरट्यांनी शहरातील बिबवेवाडी, वारजे, वारजे माळवाडी, कर्वेनगर, उत्तमनगर इत्यादी ठिकाणी चोरीचे गुन्हे केले असून, त्यांच्यावर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून तांबे-पितळेची भांडी, कपडे, एकूण सात अँडरॉईड मोबाईल, तीन मोटारसायकली, सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 2,35,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चौरट्यांनी चोरलेल्या रोख रकमेतील काही रक्कम चैन आणि मौजमजेसाठी खर्चली आहे. तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राजेश उसगावकर पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई ही परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे)च्या अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस हवालदार शैलेश आलाटे, शाम लोहोमकर, पोलीस अंमलदार अमित पुजारी, श्रीकांत कुलकर्णी, सतीश मोरे, दीपक लोंढे, तानाजी सागर, राहुल कोठावळे, अमोल शितोळे, अतुल महांगडे, चेतन कुंभार यांनी केली आहे.

get_footer();