आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चोरट्याने अडीच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 17, 2022

लष्कर पोलिसांत फिर्याद : उघड्या घरात प्रवेश करून चोरट्याने साधली संधी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : उघड्या घरातून चोरट्याने दोन लाख ४८ हजार रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला. कॅम्पमधील स्टर्लिंग हाऊस, चोक्सी शाळेजवळ १ जानेवारी सायंकाळी ६ ते १४ जानेवारी २०२२ सायंकाळी सहाच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली.

याप्रकरणी राबिया शेख (वय ३०, रा. कॅम्प, पुणे) यांनी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कॅम्पमधील स्टर्लिंग हाऊस, चोक्सी शाळेजवळ फिर्यादीच्या घरातून चोरट्याने दोन लाख ४८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. लष्कर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ए. डी. सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();