बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप उचकटून साडेतीन लाखाची चोरी
शिवणे येथील श्री कॅम्प्लेक्समधील प्रकार
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
शिवणे येथील श्री कॉम्प्लेक्समधील फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी एक लाख १२ हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख ४९ हजार ९४ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री १० ते ९ सप्टेंबर सकाळी ११ दरम्यान ही घटना घडली.
दीपक पायगुडे (वय ५०, रा. शिवणे, पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गु्न्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा फ्लॅट कुलूपबंद असताना चोरट्याने कुलूप उचकटून कपाटातील एक लाख १२ हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख ४९ हजार ९४ रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश जायभाय करीत आहेत.
