कंपनीत सहकारी तरूणीवर जडला जीव अन् भानगड
वाकड पोलिसांनी केली अटक : मार्च २०२० ते २०२१ दरम्यान घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एकाच कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने तरुणीला घरी जेवण बनवण्यासाठी बोलावून घेत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना पुण्यातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
हा प्रकार मार्च 2020 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी आणि रावेत येथील लॉजमध्ये घडला. गणेश सुधाकर पारटकर (वय-26 रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकाच ठिकाणी नोकरीला आहेत. नोकरी करत असताना त्या दोघांमध्ये मैत्री झाली. आरोपीने पीडित तरुणीला जेवण बनवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. या ठिकाणी आरोपीने पीडित तरुणाला लग्नाचे आमिष दाखून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून राहत्या घरी आणि रावेत येथील लॉजवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले.
दरम्यान, पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी आरोपीने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याची माहिती तरुणीला दिली. हे ऐकून तरुणीला धक्काच बसला. यानंतर आरोपी तिच्यासोबत पुन्हा जबरदस्ती करू लागला. त्यावेळी पीडित तरुणीने त्याला विरोध केला असता, त्याने पीडितेला मारहाण करुन तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
