आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लॉकडाऊनमध्ये कंपनीत राहतो असे सांगून केला दुसरा घरोबा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 17, 2021

येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल : रामवाडीतील ३७ वर्षीय महिलेने दिली फिर्याद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळात अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. मात्र, या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन एका नवरोबाने कामाच्या ठिकाणी राहत असल्याचे सांगून दुसरा घरोबा करीत दुसर्‍या महिलेबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी रामवाडी येथील एका ३७ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती अभिजित जाधव याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, अभिजित जाधव हा त्याच्या पत्नीला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन शारीरीक छळ करीत होता. फिर्यादीच्या पतीने लॉकडाऊनच्या काळात घरी न येता कामाचे ठिकाणी राहत असल्याचे सांगितले. त्या कालावधीत त्याने एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले. या महिलेस व तिच्या दोन मुलांना बेकायदेशीरपणे घरात आणले. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. जबरदस्तीने घरातून बाहेर काढले. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

get_footer();