आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीला फसवणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021

शिवणे येथील प्रकार : वारजे माळवाडी पोलिसांत फिर्याद दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीला रोख आणि ऑनलाईन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले. पैसे भरूनदेखील आरोपीने तरुणीला कामावर न ठेवता फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार शिवणे येथील लाइमलाइट ट्रेन्डस प्रा. लि. या कंपनीत घडला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

अभिजीत अर्जुन सुतार (वय 25, रा. लाइमलाइट ट्रेन्डस प्रा. लि. दांगट इस्टेट, अगरवाल गोडावुन बाजुला शिवणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी समीक्षा सचिन उर्फ राहुल दुधाने (वय-21 रा. अमर भारत सोसायटी, गणपती माथा, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजीत सुतार याने फिर्यादी यांना कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोख आणि ऑनलाइन दहा हजार रुपये घेतले. पैसे घेऊन देखील आरोपीने फिर्यादी यांना कामावर ठेवले नाही. त्यामुळे तरुणीने आरोपीकडे पैशांची मागणी केली. आरोपीने घेतलेले पैसे परत न करता फिर्यादी यांना ऑफिसमध्ये बसून ठेवले. तसेच दमदाटी करुन सानीका पवार या नावाने बनावट फेसबुक अकाउंट काढण्यास सांगितले. या अकाउंटवरुन आरोपीने कंपनीची जाहिरात करण्यास सांगून फिर्यादी यांची फसवणूक केली. पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करीत आहेत.

get_footer();