आवृत्ती पुणे
← Back to Homepage

क्रिकेट बेटिंग सट्टा घेणाऱ्या सहाजणांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 16, 2021

सोलापूर शहर पोलीस गुन्हे शाखेची कारवाई : चार लाख ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोलापूर शहरातील भवानी पेठ हद्दीमध्ये २०-२० वर्ल्डकपच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडच्या फायनल क्रिकेट सामन्यावर बेटिंग सट्टा घेणाऱ्या सहाजणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चार लाख ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सचिन अंबादास कमलापुरे (वय ३१), मुकुंद अंबादास कमलापुरे (वय २६, दोघे रा. साखरपेठ, सोलापूर, सध्या घोंगडेवस्ती, सोलापूर), दत्तात्रय पिट्टाप्पा बडगंजी (वय ३५, रा. जी ग्रुप वैष्णवीनगर, मारुती मंदिराजवळ, जुने विडी घरकूल, सोलापूर), चणाप्पा सिद्धाप्पा पुराणिक (वय ३१, रा. न्यू पाच्छापेठ, विजयनगर, सोलापूर, सध्या कोळकोटेनगर, सोलापूर), श्रीनिवास मुरली चिंता (वय २६, पिट्टानगर, जुने विडी घरकुल, सोलापूर), सतीष श्रीनिवास मंगलपल्ली (वय २७, रा. राघवेंद्रनगर, जुने विडी घरकुल, सोलापूर) अशी अटक केलेल्या सहाजणांची नावे आहेत.

सोलापूर शहरामध्ये अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करून समूळ उच्चाटन करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी जोडभावी पोलीस स्टेशन हद्दीत भवानी पेठ, सोलापूर येथे २०-२० वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडचे फायनल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावून फसवणूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई करून सहाजणांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडेक्रिकेट बेटिंगसाठीचे साहित्य रोख रक्कम, सट्टा घेण्यासाठीचे मोबाईल फोन, टीव्ही, एक मोटारसायकल व इतर साहित्य असा एकूण चार लाख ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस आयुक्त हरिष बैजल, पोलीस उपायुक्त बापू बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, अजय देवराम पाडवी, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, कुमार शेळके, गणेश शिंदे, राजकुमार पवार, अजय गुंड, महिला पोलीस नाईक निलोफर तांबोळ, संजय काकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();