आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 23, 2021

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कारवाई : चौघे ताब्यात ; एकाचे पलायन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दरोड्याच्या तयारीतील चार सराईतांना जेरबंद करून सात गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे शाखेच्या युनिट-६च्या पथकाने ही कारवाई केली. अंधाराचा फायदा घेऊन एक सराईत पसार झाला असून, पोलीस त्याचा तपास करीत आहेत.

अक्षय बाबासाहेब लोंढे (वय २४, रा. वानवडी, पुणे), नितीन प्रकाश शिनगारे (वय ३८, रा. पठारेवस्ती, लोणी काळभोर, पुणे), नवनाथ जनार्दन सावंत (वय ४१, रा. पुणे स्टेशन, पुणे) आणि मोहमंद गौसपाक हाजीमलंग शेख (वय २३, रा. मंगळवार पेठ, पुणे) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. अंधाराचा फायदा घेऊन एकजण पसार झाला असून, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट-५चे पथक गस्त घालत होते. त्यावेळी अभिलेखावरील आरोपी अक्षय लोंढे ऊर्फ चिकट्या व त्याचे साथीदार लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बकोरी-कोळपेवाडी रस्त्यावरील ओढ्याजवळ थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार सराईत आरोपींना ताब्यात घेतले. मात्र, एकजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. त्यांच्याकडून कोयता, चाकू, मिरची पूड, नायलॉन दोरी असे एकूण ६३६ रुपयांचे साहित्य मिळून आले. न्यायालयाकडून आरोपींना पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर तपासामध्ये आरोपी अक्षय लोंढे याने त्याच्या साथीदारासह जबरी चोरीचे सात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. लोणीकंद, कोरेगाव पार्क, बंडगार्डन, शिवाजीनगर, स्वारगेट, भारती विद्यापीठ आणि हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींवर गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले.

ही कामगिरी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-६चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली.

get_footer();