आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दरोड्याच्या तयारीतील चौघे जेरबंद, एक फरार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 26, 2021

युनिट-४ची कारवाई : बापट रस्त्यावर समर्थ स्टँडजवळ केली कारवाई

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

दरोडा टाकून लुटमार करण्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई सेनापती बापट रोडवरील समर्थ रिक्षा स्टँड जवळ मंगळवारी (दि.24) रात्री पावणे दहाच्या सुमारास केली. पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून एकजण फरार झाला आहे.

साकिब अन्सारी (वय-23), दानिश शेख (वय-22), सलमान अलवी (वय-26), वसिम अन्सारी (वय-24 रा. नागपुर चाळ, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मोहम्मद अन्सार हा फरार झाला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस नाईक विशाल कुमार शिर्के यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोडवरील शैलेंद्र सोसायटी जवळ असलेल्या समर्थ रिक्षा स्टँडजवळ पाच जण दरोडा टाकून लटुमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. तर त्यांचा एक साथिदार पळून गेला. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे लोखंडी सुरे, तलवार, कटावनी, मोबाईल, रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट चारचे सहायक पोलीस निरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.

get_footer();