आवृत्ती पुणे
← Back to Homepage

देवीच्या पूजेवरुन 3 भावांनी थोरल्या भावाला चोपले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 17, 2021

पुण्याच्या धनकवडीमधील घटना : किरकोळ कारणावरून भावजयशी झाला होता वाद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : देवीच्या पूजेवर झालेल्या वादात तिघा भावांनी थोरल्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन बेदम चोपले़ ही घटना धनकवडीतील चव्हाणनगर येथे घडली.

याप्रकरणी सुनील सुरेश पवार (वय ४३, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भावड्या सुरेश पवार (वय ३३), संतोष सुरेश पवार (वय ४०), अनिल सुरेश पवार (वय ३७) व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सुनिल पवार हे लिंबु विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी सायंकाळी सात वाजता देवीच्या पुजेच्या कारणावरुन त्यांचा तीन लहान भाऊ व भावजयीशी वाद झाला. या वादात भावड्या व संतोष यांनी फिर्यादी यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अनिल पवार याने फिर्यादीच्या घरातील काठी घेऊन त्याने फिर्यादी यांच्या कपाळावर, हातावर, कानावर व उजव्या पायावर मारुन जखमी केले. सुनिल पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सहकारनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हवालदार खुटवड तपास करीत आहेत.

get_footer();