आवृत्ती पुणे
← Back to Homepage

धनकवडीत बंद सदनिका फोडून पाच लाख ८० हजारांच्या ऐवजाची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 24, 2021

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : धनकवडीमधील बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील ८० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवरु गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सुभाष कारके (वय ४९, रा. धनकवडी, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कारके यांची सदनिका बंद असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून कपाटातील ८० हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणाचा सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घाडगे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();