आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दोघा सराईत वाहनचोरांस अटक

maharashtra jain warta • News Slider, Police • July 17, 2021

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

मोबाईलची आणि दुचाकी वाहनांची चोरी करणार्‍या दोघा सराईत चोरट्यांना पकडण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल संच आणि चार दुचाकी असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चोरलेली एक दुचाकी धनकवडी स्मशानभूमीच्या पाठीमागे विकण्यासाठी आले असताना या दोघा वाहनचोरांना पकडण्यात आले. महेश अनिल साळुंखे (वय 24, रा. सध्या धनकवडी, पुणे, मूळ गाव मु.पो. आळसुंदे राशन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) आणि शुभम सीताराम शिंदे (वय 19, सध्या रा. धनकवडी ,पुणे, मूळ गाव मु.पो. खरीव, ता. वेल्हे, जि. पुणे) अशी त्यांची नावे असून, चौकशीतून त्यांनी धनकवडी परिसरातून दुचाकी गाड्या व महागडे मोबाईल चोरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्याकडून एकूण सत्तर हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी आणि तेहत्तीस हजार रुपये किमतीचे चार महागडे मोबाईल संच, असा एकूण 1,03,000 रुपये किंमतीचा माल हस्तगत केला असून सहकारनगर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवावदार बापू खुटवाड, विजय मोरे, पोलीस नाईक प्रकाश मरगजे, भुजंग इंगळे, संदीप ननवरे, सतीश चव्हाण, पोलीस शिपाई महेश मंडलिक, किसन चव्हाण, प्रदीप बेडिस्कर आणि प्रदीप शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();