आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दोघे सराईत वाहनचोर जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 22, 2021

चंदननगर पोलिसांची कारवाई : चार दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दोघा सराईत वाहनचोरांना जेरबंद करण्यात चंदननगर पोलिसांना यश मिळाले असून, चार दुचाकींसह एकूण एक लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चंदननगर पोलिसांनी चंदननगर भाजीमंडई येथे संशयावरून दोघांना ताब्यात घेतले होते. सनी ऊर्फ विकी विजय अँडी (वय २८, रा. धानोरी रोड, आनंद पार्क, विश्रांतवाडी, पुणे) आणि साहिल विशाल जाधव (वय २१, रा. भैरवनगर, धानोरी, विश्रांतवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, दोघे अट्टल वाहनचोर आहेत.

रेकॉर्डवरील गुन्हेगार व वाहनचोरीतील दोघे जण चंदननगरमधील भाजीमंडई येथे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी सापळा रचून संशयावरून या दोघांना ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी मागील महिन्यामध्ये दोन गाड्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार तपास करून एक लाख २० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या. पुढील तपास पोलीस हवालदार तुषार भिवरकर करीत आहेत.

सदरची कामगिरी ही, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील जाधव, पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार पठाण, सुभाष आव्हाड, नामदेव गडदरे, श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, शकूर पठाण, अमित कांबळे, अतुल जाधव, राहुल इंगळे, संदीप येळे यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();