आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 15, 2021

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सिंहगड रोडवरील जनता वसाहतीमधील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सिंहगड रस्त्यावर कालव्यावरील रोडजवळ एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना सिंहगड रोडवरील रामकृष्ण मठाच्या मागील बाजूला कॅनॉल रोडजवळ मंगळवारी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घडली.

योगेश अंकुश भोकरे (वय ३८, रा. गल्ली नं. २३, जनता वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आदिती योगेश भोकरे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, योगेश भोकरे हे टेलर म्हणून काम करत होते. काल सायंकाळी ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह कॅनॉल रोडला पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता भोकरे यांच्या डोक्यात, चेहर्‍यावर दगड घालून त्यांचा खून केल्याचे आढळून आले.
पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत.

get_footer();