आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पत्नीच्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून चोरली वैयक्तीक माहिती

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 16, 2021

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पतीविरूद्ध गुन्हा : कोथरूड-बाणेर परिसरातील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या मोबाईलवर स्पाय अँड रेकॉर्डर नावाचे ॲप घेऊन नजर ठेवली. त्यानंतर पत्नीची वैयक्तीक माहिती चोरून तिचा गैरवापर केला. ही घटना कोथरूड परिसरात समोर आली आहे.

याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात 37 वर्षीय पतीच्या विरोधात आयटी ॲक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 34 वर्षीय महिलेने पतीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 2013 ते 2017 दरम्यान कोथरूड व बाणेर परिसरात हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे फिर्यादी यांच्यासोबत 2013 मध्ये विवाह झाला आहे. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करून छळ सुरू केला. तसेच, चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण सुरू केली. त्यानंतर पत्नीवर नजर ठेवण्यासाठी आरोपीने पत्नीला एक मोबाईल गिफ्ट दिल्याचा बहाणा केला. त्या मोबाईलमध्ये स्पाय ऍड रेकॉर्डर नावाचे ॲप घेतले.

याद्वारे पत्नीबाबत सर्व माहिती ठेवली. पत्नीची वैयक्तीक माहिती परस्पर चोरून ती स्वतः च्या लॅपटॉपमध्ये घेतली. वादामुळे पत्नी सोडून राहू लागल्यानंतर आरोपीने पत्नीच्या वैयक्तीक माहितीचा गैरवापर केला. हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. याप्रकरणी कोथरूड पोलिस अधिक तपास करत आहेत.

get_footer();